कोल्हापुरातून परदेशी जाणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली | पुढारी

कोल्हापुरातून परदेशी जाणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली

तानाजी खोत

कोल्हापूर : पर्यटनासाठी परदेश प्रवास करणार्‍यांमध्ये कोल्हापूर आघाडीवर असून, पुणे आणि ठाण्यानंतर राज्यात कोल्हापूरचा क्रमांक लागतो. कोरोना साथीनंतर लोकांची बचतीची सवय कमी होत असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत परदेशात जाणार्‍यांची संख्या 40 टक्क्यांनी वाढल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

कोल्हापूरकर पूर्वी पर्यटनासाठी दुबई, थायलंड, मलेशिया, सिंगापूर या देशांना पसंती देत होते. आता जपान, व्हिएतनाम, कंबोडिया, युरोपीय देश आणि दक्षिण आफ्रिका या देशांनाही लोकांची पसंती वाढली आहे. पर्यटकांमध्ये निवृत्त लोक आणि हनीमुन कपल्सचे प्रमाण अधिक आहे. हनीमुन कपल्स मालदिव, मॉरिशस आणि सेशल्स या देशांत जाण्याचा कल आहे.

देशांतर्गत पर्यटनामध्ये गेल्या काही वर्षांत राजस्थान, गुजरात आणि दक्षिणेतील राज्यांकडे जाण्याचा कल होता. यावर्षी कश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांना अधिक पसंती दिली जात आहे. देशांतर्गत विमानतळ सुविधा आणि रेल्वे प्रवासाची गुणवत्ता हे देशांतर्गत प्रवाशांच्या पत्थ्यावर पडले आहे.

शहरात 70 हून अधिक टुर ऑपरेटर्स त्यांनी येत्या हंगामासाठी मोठ्या प्रमाणावर अगाऊ बुकिंग केले आहे. देशात सर्वत्र हीच स्थिती असून अनेक देशांचे विमान आणि हॉटेल बुकिंग फुल्ल झाले आहे, असे ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी सांगितले.

* कोरोना साथीत आलेली अनिश्चितता, बचत प्रवृत्ती घटली
* पर्यटन हा जीवनशैलीचा भाग; सोशल माध्यमांचा वाढता प्रभाव

Back to top button