कोल्हापूर : राजारामपुरीत रशियन डी.जे., साऊंड सिस्टीम…अन् लाईटस्चा झगमगाट! | पुढारी

कोल्हापूर : राजारामपुरीत रशियन डी.जे., साऊंड सिस्टीम...अन् लाईटस्चा झगमगाट!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरच्या विसर्जन मिरवणुकीसोबतच राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीची चर्चा जिल्ह्यात होते. राजारामपुरीतील जनता बझार चौकातून मुख्य मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात येते. दरवर्षी वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी झळकणार्‍या मिरवणुकीत यंदा रशियन फिमेल डी. जे. लिंडा एरफ्लॉग थिरकणार आहे. तसेच लाईट, साऊंड सिस्टीमसह मंडळे सहभागी होणार आहेत.

राजारामपुरी 6 व्या गल्लीतील शिवप्रेमी मित्र मंडळाने यंदा 19 सप्टेंबरला रशियन डी.जे.ला आमंत्रित केले आहे. आगमन मिरवणुकीचा क्रमही नुकताच ठरविण्यात आला असून, शिवप्रेमी मंडळाची मिरवणूक जनता बझार चौकातून सुरू होणार आहे. राजारामपुरी तालीम मंडळ, पद्मराज तरुण मंडळ यंदा लाईट व साऊंड सिस्टीमसह सहभागी होईल. तर राजारामपुरी दहाव्या गल्लीतील इंद्रप्रस्थ तरुण मंडळाची लालबागचा राजा ही गणेशमूर्ती, सुवर्णालंकारांनी सजलेली टाकाळा माळी कॉलनी येथील गणेश तरुण मंडळाची गणेशमूर्ती, भगतसिंगचा चिंतामणी गणेश अशी वैशिष्ट्ये यंदा असणार आहे.

पोलिसांची करडी नजर

राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीत घातक लाईट इफेक्टस्वर पोलिसांनी बंदी घातली आहे. या मिरवणुकीसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. खबरदारीसाठी ठिकठिकाणी मनोरे व सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.

Back to top button