इचलकरंजीत ‘झिका’चे आणखी तीस संशयित रुग्ण

इचलकरंजीत ‘झिका’चे आणखी तीस संशयित रुग्ण

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा :  शहरात कोरोनानंतर आता 'झिका' व्हायरसचा प्रसार वाढू लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शहरात दुसरा रुग्ण आढळल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

बुधवारी दिवसभरात 30 संशयित व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले. तसेच 172 घरांमध्ये एडीसइजिप्ती डासाच्या अळ्या सापडल्या. त्या नष्ट करण्यात आल्या.

अंगणवाडी सेविका, आशा सेविका आदींसह 105 पथकांद्वारे 1 लाख 28 हजार 693 नागरिकांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. बुधवारी दिवसभरात 3 हजार 337 घरांमधील 28 हजार 107 नागरिकांची माहिती घेण्यात आली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news