कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी हुपरीत अर्धनग्न आंदोलन | पुढारी

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी हुपरीत अर्धनग्न आंदोलन

हुपरी; अमजद नदाफ : जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून उपोषण करणार्‍या मनोज जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व कुणबी दाखला वंशावळीसाठी निजामशाही पुरावे मागणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज (दि.९) हुपरी येथे ‘मराठा क्रांती’च्या वतीने अर्धनग्न आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

शहरातील  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळ मराठा क्रांतीचे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शासन प्रयत्न करीत असुन एक मराठा काय करू शकतो हे जालना येथील आंदोलनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करीत आंदोलक अर्धनग्न झाले. त्यांनी आंदोलकांवर लाठी हल्ला केल्याच्या प्रकरणाचा जोरदार निषेध केला. जालना येथील  आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. विनायक विभूते, जयराम गायकवाड, राजेंद्र पाटील, सत्ताप गायकवाड, सुरज कदम, विशाल चव्हाण, अमर माने, संताजी देसाई, प्रताप जाधव, नितीन काकडे, वैभव लायकर, राजू साळूखे, अमित गायकवाड, धनाजी शिंदे, सूर्यकांत रावन, संभाजी काटकर, बाळासाहेब तांदळे, लखन शेलार, सागर मेथे, बंडा काकडे, नितीन काटकर, सयाजी देसाई, आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत विविध प्रकारचे उग्र आंदोलने करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा : 

 

Back to top button