कोल्हापूर : चार किलो गांजा जप्त; दोघांना अटक | पुढारी

कोल्हापूर : चार किलो गांजा जप्त; दोघांना अटक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : इस्पुर्ली पोलिसांनी चार किलो गांजा जप्त केला असून, तळाशी येथील गुरुदेव नामदेव राऊत, रामचंद्र रंगराव आंगज यांना अटक केली आहे. तर सरवडे येथील राहुल कृष्णात पाटील हा पळून गेला आहे. यांच्याकडून एक कार, चार किलो गांजा असे सुमारे सहा लाख आठ हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांजा तस्करीत मोठे रॅकेटची शक्यता आहे.

राधानगरी, भुदरगड, कागल, आणि करवीर तालुक्यात गांजा सेवन मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. रविवारी रात्री इस्पुर्ली पोलिस कोल्हापूर-गारगोटी राज्य मार्गावर गस्त घालत होते, याच पोलिसांना गाडीचा संशय आल्याने त्यांनी ती अडवली, यावेळी सरवडे येथील राहुल पाटील हा अंधाराचा फायदा घेत पळून गेला. तर गाडीत तळाशी येथील गुरुदेव राऊत आणि रामचंद्र आंगज हे बसले होते. त्यांच्या शीटच्या खाली चार किलो गांजा सापडला. पेलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे

Back to top button