शिवाजी विद्यापीठ कुलसचिव पदासाठी उद्या होणार मुलाखती | पुढारी

शिवाजी विद्यापीठ कुलसचिव पदासाठी उद्या होणार मुलाखती

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिवाजी विद्यापीठ कुलसचिव पदाच्या मुलाखतीसाठी मुहूर्त सापडला आहे. या पदासाठी 16 पात्र उमेदवारांच्या मंगळवारी (दि. 29) मुलाखतीची प्रक्रिया पार पडणार आहे. यात विद्यापीठातील चार जणांचा समावेश आहे.

विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांचा कार्यकाल नोव्हेंबर 2021 मध्ये संपला. दोन वर्षांपासून विद्यापीठाचा कार्यभार प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्याकडे आहे. विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव पदासाठीची प्रक्रिया राबविली गेली. मात्र, दोनवेळा विविध कारणांमुळे पात्र उमेदवार मिळाला नाही. त्यानंतर 20 जुलै 2022 रोजी पुन्हा प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामधून 16 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.

यात प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव, उपकुलसचिव संजय कुबल, डॉ. मुरलीधर भानरकर, पुणे विद्यापीठाचे परीक्षा संचालक महेश काकडे यांच्यासह धनंजय ठोंबरे, प्रमोदकुमार शिरोटे, रविकुमार नाईक, विजय कुंभार, श्रीकांत अंधारे, प्रकाश पाटील, सचिन कदम, मलिक रोकडे, रिमेथ दायस, बाजीराव पाटील, परशराम शहापूरकर यांचा समावेश आहे. सात सदस्यीय निवड समितीकडून ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. कुलसचिवपदी कोणाची वर्णी लागते? याकडे शिक्षणक्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button