कोल्हापूर जिल्ह्यातील 30 सोसायट्यांत मिळणार जेनेरिक औषधे

कोल्हापूर जिल्ह्यातील 30 सोसायट्यांत मिळणार जेनेरिक औषधे
Published on
Updated on

कोल्हापूर : गावागावांतील विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये (सेवा सोसायट्या) बँकिंग सुविधेसह जेनेरिक औषध दुकाने व अन्य 151 प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा व्यवसाय करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक सोसायट्यांनी जेनेरिक औषध दुकाने सुरू करण्याची तयारी दर्शवली असून, यासंबंधी लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे.

राज्यातील गावपातळीवर 21 हजारांवर विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमार्फत शेतीसाठी पतपुरवठा करणे, बी-बियाणे विक्री केंद्र सुरू करणे, पेट्रोल पंप सुरू करणे, अडत दुकान, कापड दुकान यासह 31 प्रकारचे व्यवसाय सुरू करता येत होते. यामध्ये केंद्र सरकारने जेनेरिक औषध दुकान सुरू करणे, रोपवाटिका, वजनकाटा सुरू करणे, सोने तारण, वाहन तारण, गृह कर्ज योजना, ठेवीवर कर्ज देणे अशा नव्या व्यवसायांची भर घातली आहे. आता हे व्यवसाय वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने सेवा सोसायट्यांना करता येणार आहेत. त्यासाठी पोटनियमात दुरुस्ती करावी लागणार आहे.

करता येणारे व्यवसाय

कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी कर्ज, ग्रामीण बिगरशेती क्षेत्रातील नवीन उपक्रमांना कर्ज, वैयक्तिक कर्ज, बचत गटांना कर्ज, सोने तारण कर्ज सुविधा, वाहन तारण, गृह कर्ज आणि ठेव तारण कर्ज, बँकिंग सुविधा, लहान आणि छोटा व्यवसाय सुरू करणे, सुरक्षा नियुक्त करणे, शेती आणि शेतकर्‍यांशी निगडित व्यवसाय सुरू करता येणार आहेत.

शेतीमाल आणि त्याची प्रतवारी, कृषी ई-सेवा, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आणि विक्री, शेतीमालाचा लिलाव केंद्र, ऑईल मिल, पिकांसाठी साठवण गोदाम, मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया करणे, दूध संकलन सुरू करणे अशा व्यवसायांचा समावेश आहे.

बँकिंग सुविधा

आधार सक्षम पेमेंट सेवा, एटीएम, बचत गट बँक, पिग्मी, आरडीएफ, पीक विमा, शेतकरी पेन्शन योजना एकत्रीकरण करणे यामध्ये कमिशनच्या आधारावर एजन्सी सुरू करता येणार आहे, जेनेरिक औषध दुकाने सुरू करणे, कृषी बियाणे, खते, औषधे (निविष्टा विक्री), कीटकनाशके, पशुखाद्य विक्री करणे, कृषी सेवा केंद्र सुरू करणे, कृषी उपकरणे विक्री करणे, ठिंबक सिंचन योजनेचा आराखडा तयार करणे, त्यासाठीचे स्प्रिंकलर सेवा युनिटस् सुरू करणे, पीव्हीसी पाईप्स विक्री, फलोत्पादनासाठी रोपवाटिका तयार करणे, रोप विक्री करणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news