रानफळांवरील प्रक्रिया उत्पादनांतून पर्यटन उद्योगाला गती : संतोष पाटील | पुढारी

रानफळांवरील प्रक्रिया उत्पादनांतून पर्यटन उद्योगाला गती : संतोष पाटील

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : महिला बचत गटांची स्थानिक उत्पादने, रानफळांवरील प्रक्रीया उत्पादनांची विक्री केंद्रे उभारून  आंबा मानोली पंचक्रोशीतील पर्यटन उद्योगाला गती देता येईल असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केला. उमेद अभियान अंतर्गत आंबा आयोजित महिला शिबीरात ते बोलत होते. यावेळी प्रकल्प संचालक सुषमा देसाई व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूणराव जाधव प्रमुख उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, शाहूवाडी तालुक्यात निसर्ग व ऐतिहासिक पर्यटनातून रोजगार निर्मितीची मोठी संधी आहे. पर्यटन उद्योगात कुशल महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. वर्षा पर्यटनात रेनकोट निर्मिती, रानभाजी लागवड ते प्रक्रिया पदार्थ यासारख्या संधी शोधता येईल. येथील रिसॉर्ट व हाँटेलमधून महिला उत्पादनांचा विक्रीस ठेवणारी व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांनी उभी करावी. जंगली फळावर प्रक्रिया केलेले सेंद्रीय, भेसळमुक्त पदार्थ पर्यटकांना उपलब्ध होतील अशी सामुदायिक व्यवस्था आवश्यक आहे.

प्रारंभी सह्यगिरी महिला बचत गटाने मांडलेल्या रानभाजी व रानमेवा प्रदर्शनाचे उद्घाटन पाटील यांनी केले. यावेळी बांबू आर्ट, शेती पूरक प्रक्रीया उद्योग, बांबू लागवड, प्रशिक्षणे, विक्री केंद्र यांची मागणी महिला बचत गटांनी केली. यावेळी तळवडे, चाळणवाडी, आंबा, चांदोली, घोळसवडे, निळे, पुसार्ळे, परळेनिनाई, वालूर, येलूर येथील महिला ग्राम संघाच्या सदस्या उपस्थित होत्या.  स्वागत सायली लाड यांनी केले. प्रास्तविक दिगंबर सावंत यांनी केले.

यावेळी, पाटील व देसाई यांनी महिला व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून उमेद अभियान अंतर्गत योजनांचा आढावा घेतला. यावेळी शाहूवाडीच्या गटविकास अधिकारी सुष्मिता शिंदे, एच.एस.कठारे यांनी मार्गदर्शन केले. तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.एच.निरंकारी, योगेश फोडे, केंद्र प्रमुख राजेंद्र लाड, माजी सरपंच अनिल वायकूळ, उपसरपंच डी.जी.लांबोर, सदस्य दिपक कोलते, सुलतान पटेल, अनिता कांबळे, श्रुती पाटील, निता वारंग आदी प्रमुख उपस्थित होते.आभार ग्रामसेवक सुभाष पाटील यांनी मानले.
तसेच, सकाळी शाहूवाडी पंचायत समितीच्या विविध खातेप्रमुखांची बैठक घेऊन संतोष पाटील यांनी शासकीय योजना व विकास कामांचा आढावा घेतला. लम्पी प्रतिबंध लसीकरण शिबीर व मानोली येथील अमृतवन उत्पादक बचत गटाला भेट देवून, प्राथमिक शाळा. दवाखाना, अंगणवाडी यांना नियोजित भेटी दिल्या. मलकापूर हायस्कूल येथे चांद्रयान लँडिंग प्रक्षेपणाचा क्षण श्री पाटील यांनी विद्यार्थ्यांसमवेत व्यतीत करून विज्ञान निष्ठा जपण्याचा मंत्र त्यांनी दिला.

.हेही वाचा 

नाशिक : ‘टेस्ट ड्राइव्ह’च्या बहाण्याने कार घेऊन झाला पसार, पोलिसांनी जव्हारमध्ये पकडले

बारामती कचरा डेपोस भीषण आग ; ८० लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज

पुणे : महागड्या गाड्यांची हायटेक चोरी करणारे अटकेत

Back to top button