पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन २०२३ चा आज शानदार शुभारंभ | पुढारी

पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन २०२३ चा आज शानदार शुभारंभ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : टूर प्लॅनिंग असो वा टूर डेस्टिनेशनची माहिती, आकर्षक टूर पॅकेजेस कंपन्यांच्या डिस्काऊंट ऑफर्स, हे सर्वकाही एकाच छताखाली उपलब्ध दैनिक पुढारी आयोजित टूर अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन 2023 चा आज शानदार शुभारंभ होत आहे. हेवन हॉलिडेज प्रस्तुत दैनिक पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन – 2023, पॉवर्ड बाय गगन टूर्स, या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार (दि. 19) रोजी सकाळी 10.30 वाजता वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.

इनक्रेडिबल इंडिया भारत सरकार टुरिझम विभाग या एक्झिबिशनचा सहप्रायोजक असून टूरिस्ट इन्फर्मेशन ऑफिसर अक्षय कल्याणकर, हेवन हॉलिडेजचे राजू बुगडे, गगन टूर्सच्या नंदीनी खुपेरकर, दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

कोरोना साथीनंतर लोकांचा पर्यटनाकडील ओढा वाढला असून ठराविक वर्गापुरती मर्यादित असलेली पर्यटनाची क्रेझ आता समाजाच्या विविध स्तरात पोहोचली आहे. समाजातील प्रत्येक जण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार देशाटनासाठी सवड काढताना दिसत आहे. या बदलत्या ट्रेंडला अनुसरून पर्यटनाच्या नवनव्या डेस्टीनेशन्सच्या शोधात असलेल्यांसाठी दै. ‘पुढारी’च्या वतीने पर्यटनाचे भरगच्च पर्याय असलेले हे प्रदर्शन सांगली आणि कोल्हापूर येथे व्ही. टी. पाटील स्मृती सभागृह कोल्हापूर येथे 19, 20 आणि 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. तर सांगलीमध्ये कच्छी समाज भवन राम मंदिर चौक सांगली येथे 25,26 आणि 27 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे.

अलीकडच्या काळात समाजात पर्यटनाची क्रेझ वाढत असून पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत आहेत. कोल्हापुरातून देशात आणि परदेशात पर्यटनासाठी जाणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून एकाच छताखाली पर्यटनाचे भरपूर पर्याय उपलब्ध करून देणारे हे प्रदर्शन आपल्या सहलीचे परफेक्ट प्लॅनिंग करण्याची संधी कोल्हापूरकर नागरिकांना देणार आहे.

हौशी पर्यटकांना एकाच ठिकाणी पर्यटनाचे विविध पर्याय उपलब्ध देणारे हे तीन दिवस चालणार आहे. टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन – 2023 कच्छी समाज भवन राम मंदिर चौक सांगली येथे 25,26 आणि 27 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळ, आयसीटी ट्रेनिंग याचा वापर केला जात आहे. विमान नाईट लँडिंग, रेल्वे, रस्त्यांचे जाळे या प्रकारच्या सुविधांमुळे देश-विदेशात पर्यटनास खूप वाव निर्माण झाला आहे. याची संपूर्ण माहिती विविध सहल व्यवस्थापन कंपन्या लोकांना देणार आहेत.

टूर अँड ट्रॅव्हल कंपन्यांसोबतच, रिसॉर्टस्, विकेंड पिकनिक स्पॉट्स, देशांतर्गत आणि देशाबाहेरील विमान प्रवास, कौटुंबिक सहली आयोजक कंपन्या यांची मागणी वाढत असून पर्यटक नेहमीच चांगले पर्याय शोधत असतात. त्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.

लोकांना देशविदेशातील पर्यटनस्थळाला भेटी देण्याचा ट्रेंड वाढत आहे. अशा सर्व घटकांसाठी हे प्रदर्शन एक सुवर्णसंधी ठरणार आहे. त्यामुळे या संधीचा अधिकाधिक हौशी कोल्हापूरकरांनी लाभ घ्यावा, घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

एक्झिबिशनमध्ये सहभागी कंपन्या

इंडिया टुरिझम, गगन टूर्स, हेवन हॉलिडेज, फ्लॅमिंगो हॉलिडेज, हॉलिडे स्टोअर इंडिया, क्वेस्ट टूर्स, भोसले टूर्स अँड गिरीकंद ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, थॉमस कूक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मिरॅकल हॉलिडेज, चौधरी यात्राकंपनी प्रायव्हेट लिमिटेड, मँगो हॉलिडेज, एलपीओ हॉलिडेज, एसओटीसी हॉलिडेज, एम. डी. टूर्स, विश्रांती टूर्स, ट्रॅव्हल पॉईंट, श्री सिद्धिविनायक टूर्स, बीजी टूर्स कोल्हापूर, क्लब महिंद्रा. मेक माय ट्रीप आदी.

Back to top button