कोल्हापूर-मुंबई विमानसेवा एक ऑक्टोबरपासून दररोज, खा. धनंजय महाडिक यांची माहिती | पुढारी

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा एक ऑक्टोबरपासून दररोज, खा. धनंजय महाडिक यांची माहिती

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा,  कोल्हापूर ते मुंबई मार्गावर एक ऑक्टोबरपासून दररोज विमानसेवा सुरू होणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी ही माहिती दिली.

स्टार एअर कंपनीकडून कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर अशी रोज विमानसेवा सुरू होत असल्याने व्यापारी, उद्योजक, कलाकार, खेळाडू ‘अशा सर्वांचीच सोय होणार आहे. रोज सकाळी साडेनऊ वाजता मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने विमान उड्डाण करेल आणि सकाळी साडेदहा वाजता हे विमान कोल्हापुरात येईल. त्यानंतर सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने विमान झेप घेईल आणि सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी मुंबई विमानतळावर उतरेल, असेही ते म्हणाले.

Back to top button