

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : जयसिंगपूर येथून शंकेश्वर ज्वेलर्सचे मालक नवलमल साकलचंद पोरवाल (वय 72) व त्यांचा पुतण्या यश राजेंद्र पोरवाल (वय 28) यांचे रविवारी रात्री अपहरण करून खंडणीची मागणी केल्याची घटना घडली होती. अखेर या अपहरण प्रकरणातील रेकॉर्डवरील 8 गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली.
यात अक्षय अजित पाराज उर्फ एपी. (वय 28, रा.पोष्ट ऑफीस जवळ, दानोळी ता.शिरोळ) व याचे साथीदार सचिन कल्लाप्पा सुरपुसे (वय 28, रा.मंगेशनगर, कोथळी, ता.शिरोळ), अखिलेश अजित पाटील (वय 27, रा.ग्रामपंचायतजवळ, कोथळी, ता.शिरोळ), कार्तिक तेजपाल म्हाळुंगे (वय 23, रा.पाण्याचे टाकीजवळ, दानोळी, ता.शिरोळ), राजू अशोक लोहार (वय 31, रा.नागराज चौक, कोथळी, ता.शिरोळ), स्वातंत्र रविंद्र पाटील (वय 23, रा.पाटील गल्ली, जैन वस्ती, जैनापूर, ता.शिरोळ), सोनल उर्फ सोन्या उर्फ निलेश महादेव कुंभार (वय 29, रा.गल्ली नं.06, राजीव गांधीनगर, जयसिंगपूर ता.शिरोळ), राकेश रावसो कल्याणी (वय 24, रा.कल्याणीवाडी, चिपरी ता.शिरोळ) अशी संयशित आरोपींची नावे आहेत.
येथील शंकेश्वर ज्वेलर्सचे मालक नवलमल पोरवाल व त्यांचा पुतण्या यश पोरवाल यांचे रविवारी (दि.13) रोजी अपहरण केले होते. घटनेनंतर संशयितांनी मध्यरात्री यश पोरवाल यांचे मोबाईलवरून नातेवाईकांशी संपर्क केला. व नवलमल पोरवाल व यश पोरवाल यांना किडनॅप केलेे असून ते सही सलामत पाहिजेे असतील तर तुम्ही पैशाची जुळणी करा असे सांगून फोन कट केला होता. त्यानंतर अपहरणकर्त्यांची सुटका केली होती.
अक्षय पाराज याच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात खून व खुनाचा प्रयत्न असे 02 गुन्हे दाखल आहेत. तर सचिन कल्लाप्पा सुरपुसे याच्यावर कुरूंदवाड, सांगली शहर, सांगली ग्रामीण, शहापूर येथे दरोडा, जबरी चोरी व मोटर सायकल चोरीचे असे 5 गुन्हे दाखल आहेत तर अखिलेश अजित पाटील याच्यावर जयसिंगपुरात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.