मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांना फटका | पुढारी

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांना फटका

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वेची वाहतूक आज (बुधवार) सकाळी तीन वेगवेगळ्या कारणांमुळे रखडली. याचा फटका कामावर निघालेल्या प्रवाशांना बसला.

सोलापूरहुन मुंबईला येणाऱ्या 12116 एक्सप्रेस मध्ये आज सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकात चेन पुलिंग झाले. त्यामुळे गाडी जागीच खोळंबली. यामुळे या एक्सप्रेसच्या मागे असणाऱ्या जलद लोकल आणि काही एक्सप्रेस रखडल्या. या गोंधळामुळे कामावर जायला उशिर झाल्याने गाड्‍यांना गर्दी झाली. त्यातच रेल्वे प्रशासनाणे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी जलद मार्गांवरील गाड्या धीम्या मार्गावरून वळविल्या.

गाडयांना गर्दी झाल्यामुळे गाडीत चढता येत नव्हते. यामुळे संतप्त झालेली एक महिला दिवा स्थानकात अप खोपोली लोकलच्या मोटरमनच्या केबिन मध्ये गेली. ही महिला खाली उतरण्यास तयार नसल्याने मोटरमनने काही वेळ लोकल थाबवली. त्यामुळे वेळापत्रकाचे तीन तेरा वाजले. यामुळे दिवा स्थानकात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर भांडुप ते नाहूर दरम्यान अप जलद मार्गांवर तांत्रिक बिघाड झाला. यामुळे सकाळ पासून मध्य रेल्वेची सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक खोळबळी आहे.

हेही वाचा : 

Back to top button