कोल्हापूर: नवे पारगाव येथील अंगणवाडी सेविकेचा मुलगा झाला असिस्टंट कमांडंट | पुढारी

कोल्हापूर: नवे पारगाव येथील अंगणवाडी सेविकेचा मुलगा झाला असिस्टंट कमांडंट

कासारवाडी: पुढारी वृत्तसेवा : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील प्रशिक सुरेश कांबळे यांची संघ लोकसेवा आयोगाच्या वतीने केंद्रीय राखीव पोलीस दलात घेण्यात आलेल्या सन २०२२ च्या परीक्षेतून असिस्टंट कमांडंट पदी निवड झाली. देशातून १५५ व्या रँकने यश संपादन केले. प्रशिकचे शालेय शिक्षण वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंग्लीश ॲकॅडमी तर महाविद्यालयीन शिक्षण वारणा महाविद्यालयात झाले.

सन २०१९ पासून त्याने संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास चालू केला. सध्या मुंबई येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. काका जयपाल कांबळे, आई-वडील, गुरुजन यांच्या मार्गदर्शनातून आपली वाटचाल यशस्वी झाल्याचे प्रशिकनी सांगितले. आई प्रज्ञा कांबळे नवे पारगाव अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे. तर वडील सुरेश कांबळे हे खासगी कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करतात. मंगळवारी गावात त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

हेही वाचा 

Back to top button