कोल्हापूर : केएमटीच्या ताफ्यात नवीन 27 बसेस | पुढारी

कोल्हापूर : केएमटीच्या ताफ्यात नवीन 27 बसेस

सतीश सरीकर

कोल्हापूर : केएमटीच्या ताफ्यात लवकरच तब्बल 27 बसेस येणार आहेत. केएमटी प्रशासन स्वनिधीतून 13 बसेस घेणार आहे. आमदार निधीतून वातानुकूलीत 9 बसेस मिळणार आहेत; तर राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत इलेक्ट्रिक 5 बसेस घेण्यात येणार आहेत. त्यामुळे केएमटीला उभारी येणार असून, विविध मार्गांवर प्रवाशांना सेवा मिळणार आहे. कोल्हापूरची लाईफलाईन असलेल्या केएमटीला पुन्हा गती येणार आहे.

आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील व आ. जयश्री जाधव यांनी केएमटीसाठी संयुक्तरीत्या 3 कोटी 40 लाखांचा निधी दिला आहे. त्यातून केएमटीच्या ताफ्यात 9 बसेस येणार आहेत. प्रत्येक आमदार निधीतून 3 बसेस खरेदी केल्या जाणार असून, त्या वातानुकूलीत (ए.सी.) असतील. केएमटीच्या इतिहासात पहिल्यांदाच वातानुकूलीत बसेस प्रवाशांसाठी धावणार आहेत. हरियाणात बसेसची बांधणी सुरू आहे. 15 ऑगस्टला बसेस कोल्हापुरात आणल्या जाणार आहेत.

महापालिकेला दोन वर्षांपूर्वी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत कोट्यवधींचा निधी आला आहे. महापालिकेच्या तिजोरीत तो निधी पडून आहे. अखेर 6 कोटी 50 लाखांचा निधी केएमटीसाठी वापरण्यात येणार आहे. या निधीतून महापालिका 5 इलेक्ट्रिक बसेस घेणार आहे. त्यासाठी

Back to top button