File Photo
File Photo

कोल्‍हापूर : पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली; राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ३९ फूट

कोल्‍हापूर ; पुढारी वृत्‍तसेवा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच असून रविवारी मध्यरात्री पंचगंगेने ३९ फूट ही इशारा पातळी गाठली होती. दरम्‍यान आज (सोमवार) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीने ३९ फूट ०३ इंच अशी इशारा पातळी ओलांडली आहे.

यामुळे आता शहरासह जिल्ह्यात पूरस्थितीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाणी पातळीत सतत वाढ सुरू असल्याने संभाव्य महापुराच्या धोक्याने पूरप्रवण भागातील नागरिक, जनावरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. व्यापार्‍यांनीही साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.

पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. रविवारी पाण्याखाली गेलेल्या बंधार्‍यांची संख्या 80 वर गेली. कोल्हापूर-गगनबावडा-वैभववाडी या राष्ट्रीय महामार्गासह 55 मार्गांवर पाणी आल्याने त्यावरील वाहतूक बंद आहे. यामुळे जिल्ह्यातील 200 हून अधिक गावांचा एकमेकांशी असणारा थेट संपर्क तुटलेला असून पर्यायी मार्गांनी सुरू असलेल्या वाहतुकीचा नागरिकांना फटका बसत आहे.

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news