कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार | पुढारी

कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शिंगणापूर योजनेच्या मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती काढण्याचे काम करण्यात येणार असल्याने सोमवारी (दि. 17) शहराला पाणीपुरवठा होणार नाही. शहरातील ई वॉर्ड, ए व बी वॉर्ड, त्यास संलग्नित उपनगरे यामुळे प्रभावित होणार असून महापालिका प्रशासन टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविणार आहे. मंगळवारीही काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

यंदा उन्हाळ्यापासून महापालिकेने पाणी कपात केली आहे. पावसाचा अद्यापही पत्ता नाही. त्यामुळे सध्या एक दिवसआड पाणीपुरवठा होत आहे. त्यातच जलवाहिन्यांना लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. दर पंधरा दिवसांनी, एक महिन्याने गळती काढण्याचे काम हाती घेतलेलेच असते. त्यामुळे वारंवार पाणीपुरवठा खंडीत होतो. आता सोमवारी पाणीपुरवठा बंद होणार आहे. मंगळवारी (दि. 18) काही ठिकाणी अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन केले आहे.

Back to top button