मंत्री हसन मुश्रीफ यांची दै. ‘पुढारी’स सदिच्छा भेट | पुढारी

मंत्री हसन मुश्रीफ यांची दै. ‘पुढारी’स सदिच्छा भेट

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मंत्री हसन मुश्रीफ यांनी दैनिक ‘पुढारी’ कार्यालयास शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी दैनिक ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दैेनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी मंत्री मुश्रीफ यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी माजी नगरसेवक राजेश लाटकर, रमेश पोवार, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर आदी उपस्थित होते.

Back to top button