कोल्हापूर : ‘कस्तुरीचा स्नेहमेळावा’ | पुढारी

कोल्हापूर : ‘कस्तुरीचा स्नेहमेळावा’

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै.‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्नेहमेळावा घेण्यात येणार आहे. आज शुक्रवार, दि. 14 रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे दुपारी 2 वाजता हा रंगारंग कार्यक्रम होईल. अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या विशेष सहभागाने हा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न होणार आहे. महिलांसाठी हा कार्यक्रम खुला असून, कस्तुरी क्लब सभासदांशिवाय इतरही महिलांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.

कार्यक्रमात महिला सभासदांसाठी सोलो डान्स, ग्रुप डान्स, रिल, सिंगिंग यासह फॅशन शोचा समावेश असून या स्पर्धांमधून विजेत्या ठरणार्‍या महिलांना खास आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे. सोबतच महिलांसाठी लकी ड्रॉ घेण्यात येणार आहे.

ऐकू न येणारा, बोलता न येणारा आणि बघता न येणारा असे तीन जीवलग डिटेक्टिव्ह मित्र एका प्रकरणाचा गंमतीशीर छडा कसा लावतात, याची धमाल दाखवणारा ‘अफलातून’ सिनेमा आहे. हा चित्रपट 21 जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत असून, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार आपल्या भेटीस येत आहेत.

* कार्यक्रमात प्रथम सहभागी होणार्‍या

200 महिलांना मानाची नथ मिळणार आहे. यामुळे महिलांनी कार्यक्रमस्थळी ठिक 2 वाजता उपस्थित राहून नथीचा मान पटकावावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

* कार्यक्रमात महिलांनी प्लेन कोणत्याही रंगाची साडी परिधान करून छत्रीसह सहभागी व्हावे. या महिलांमधूनच लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यातील विजेतीला मोत्यांचा राणीहार भेट स्वरूपात दिला जाणार आहे. इतर स्पर्धांमधील विजेत्यांना बुगडी, ठुशी, नथ, क्रिस्टल माळ, वज्रटिका असे पारंपरिक दागिन्यांची भेट दिली जाणार असून कॉस्मेटिक गिफ्ट हॅम्परही दिले जाणार आहे.

सिद्धार्थ जाधव यांचा ‘अफलातून’ दौरा

आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत ‘अफलातून’ या सिनेमातील कलाकारांची टीम कोल्हापूरकरांच्या भेटीसाठी येत आहे. सकाळी 10.30 वाजता स्वामी विवेकानंद कॉलेज येथे, दुपारी 2 वाजता संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे, दुपारी 3.15 वाजता देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज (कॉमर्स कॉलेज) येथे, दुपारी 4 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे दै.‘पुढारी’ कस्तुरी क्लब सभासद आणि त्याच्या मैत्रिणींसाठी आयोजित कार्यक्रमात सर्व टीम सहभागी होणार आहे.

Back to top button