‘कस्तुरी’चा स्नेहमेळावा सिद्धार्थ जाधवसोबत रंगणार | पुढारी

‘कस्तुरी’चा स्नेहमेळावा सिद्धार्थ जाधवसोबत रंगणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै. पुढारी कस्तुरी क्लबच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्नेहमेळावा घेण्यात येत आहे. शुक्रवार, दि. 14 रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे दुपारी 2 वाजता हा रंगारंग कार्यक्रम होणार आहे. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासोबतच जुन्या-नव्या पिढीसोबत अनोळखी नाती निर्माण करण्याच्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिने अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या विशेष सहभागाने हा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न होणार आहे. महिलांसाठी हा कार्यक्रम खुला असून कस्तुरी क्लब सभासदांशिवाय इतरही महिलांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे

कार्यक्रमात महिला सभासद सोलो डान्स, ग्रुप डान्स, रिल, सिंगिंग यांसह फॅशन शोचा समावेश असून या स्पर्धांमधून विजेत्या ठरणार्‍या महिलांना साई समर्थ पर्ल्सकडून ज्वेलरी तसेच आर्च कॉस्मेटिक यांच्याकडून खास आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे. सोबतच महिलांसाठी लकी ड्रॉ घेण्यात येणार आहे. यातील विजेत्यांसाठी खास भेटवस्तू देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे गिफ्ट प्रायोजक ताराबाई रोड, तटाकडील परिसरातील साई समर्थ पर्ल्स आहेत. त्याच्या सर्वेसर्वा वैशाली रेवणकर यांचे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या दुकानात एक ग्रॅम फॉर्मिंगचे गोल्ड, मोती, अमेरिकन डायमंड, कर्नाटकी अँटिक, ऑक्सिडाईज्ड दागिने उपलब्ध आहेत.

ऐकू न येणारा, बोलता न येणारा आणि बघता न येणारा असे तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्र एका प्रकरणाचा गमतीशीर छडा कसा लावतात, याची याची धमाल दाखवणारा ‘अफलातून’ सिनेमा आहे. 21 जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत असून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार आपल्या भेटीस येत आहेत. कार्यक्रमातील विविध स्पर्धांमधील सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. 13 जुलैपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

नावनोंदणी तसेच अधिक माहितीसाठी 8805024242 , 8329572628.

* कार्यक्रमात सहभागी होणार्‍या पहिल्या 200 महिलांना मानाची नथ मिळणार आहे. यामुळे महिलांना कार्यक्रमस्थळी ठीक दोन वाजता उपस्थित राहून नथीचा मान पटकवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

* कार्यक्रमात महिलांनी प्लेन कोणत्याही रंगाची साडी परिधान करून छत्रीसह सहभागी व्हावे. या महिलांमधूनच लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यातील विजेतीला मोत्यांचा राणीहार भेट स्वरूपात दिला जाणार आहे. तसेच इतर स्पर्धांमधील विजेत्यांना बुगडी, ठुशी, नथ, क्रिस्टल माळ, व—जटिका अशा पारंपरिक दागिन्यांची भेट दिली जाणार आहे.

Back to top button