राष्ट्रवादीच्या पोस्टरवर शिंदे अन् फडणवीस | पुढारी

राष्ट्रवादीच्या पोस्टरवर शिंदे अन् फडणवीस

गडहिंग्लज, पुढारी वृत्तसेवा : राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकारवर होत असलेली टीका तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवारांबद्दल सुरू असलेल्या चर्चा व अशातच आ. हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने उभारलेल्या फलकांवर थेट मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह शरद पवार व अजित पवार यांचे फोटो छापले असून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो नसताना थेट शिंदे व फडणवीस व दोन्ही पवारांचे फोटो छापल्याने याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.

कागल मतदारसंघातील उत्तूर व कडगाव तसेच गडहिंग्लज शहरांमध्ये मुश्रीफांचे ‘शासन आपल्या दारी’ हे कार्यक्रम होणार असून यावरील पोस्टरवर शिंदे-फडणवीस व पवारांचे फोटो छापल्याने याची चर्चा जोरात झाली.

हा शासनाचाही कार्यक्रम असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांचे व शासनाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो छापले आहेत. महाविकास आघाडीचा यामध्ये संबंध नसून विनाकारण गैरसमज पसरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट केले. विविध योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या हे राज्य सरकारला दाखविण्यासाठीच ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आपल्या मतदारसंघात घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button