कोल्हापूर : बिद्री कारखान्याच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी | पुढारी

कोल्हापूर : बिद्री कारखान्याच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी

बिद्री; पुढारी वृत्तसेवा : येथील श्री दूधगंगा – वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने निवडणूक त्वरित घ्यावी, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी (दि. 22) सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या निर्णयाकडे पदाधिकार्‍यांसह सभासदांचे लक्ष लागले आहे.

बिद्री साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपली असून, निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक प्रक्रिया सुरू करून मध्यावर आणली आहे. यावर आ. प्रकाश आबिटकर यांनी पावसाचे कारण पुढे करीत निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्याची मागणी शासनाकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने कारखान्याची निवडणूक 30 सप्टेंबरनंतर घेण्याचा आदेश जारी केला होता. या आदेशाला आव्हान देत सत्ताधार्‍यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

Back to top button