कोल्हापुरात सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा | पुढारी

कोल्हापुरात सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  पंचगंगा व भोगावती नदीची पाणी पातळी कमी झाल्याने कोल्हापूर शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे पंचगंगा व भोगावती नदीत पुरेसे पाणी उपलब्ध होईपर्यंत सोमवारपासून (दि. 19) शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सोमवारी पाणीपुरवठा होणार्‍या भागात मंगळवारी पाणीपुरवठा होणार नाही. या क्रमानुसारच पुढील दिवशीही पाणीपुरवठा एक दिवसाआड होणार असल्याची अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

या भागाला सोमवारी पाणी

ए, बी वॉर्ड व त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग व शहराअंतर्गत येणार्‍या संपूर्ण जिवबा नाना जाधव पार्क परिसर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, पुईखडी, बापूरामनगर, हरिप्रियानगर, साने गुरुजी वसाहत, राजेसंभाजी परिसर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, जरगनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखेनगर टाकीवर अवलंबून असलेला परिसर, कात्यायनी कॉलनी, योगेश्वरी कॉलनी, शिवाजी पेठ, मिरजकर तिकटी, वारे वसाहत, मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, रामानंदनगर, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकर नगर, कळंबा टाकीवर अवलंबून असणारा परिसर, सुभाषनगर पंपिंगवर अवलंबून असणारा परिसर, शेंडा पार्क टाकीवर अवलंबून असणारा परिसर, जवाहरनगर, वाय. पी. पोवारनगर, मिरजकर तिकटी, इंगवले कॉलनी, सुलोचना पार्क, म्हाडा कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, अरुण सरनाईक नगर, माजगावकर नगर, बीडी कॉलनी, निचिते कॉलनी, बोंद्रेनगर, महालक्ष्मी कॉलनी, सुर्वे कॉलनी, गणेश कॉलनी, संतोष कॉलनी, मोरे-माने नगर, वाल्मिकी आंबेडकरनगर, देशमुख हायस्कूल परिसर, आझाद गल्ली, मटण मार्केट, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी 5, 6, 7 व आठवी गल्ली, कामगार चाळ, सुभाष रोड, चांदणी चौक, रविवार पेठ, उमा टॉकीज परिसर, सुतार वाडा, खानविलकर पेट्रोल पंप, अकबर मोहल्ला, साळी गल्ली, महाराणा प्रताप चौक, शाहूपुरी कुंभार गल्ली, भवानी मंडप परिसर, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महालक्ष्मी नगर, टेंबे रोड, सावित्रीबाई फुले दवाखाना परिसर.

या भागाला मंगळवारी पाणी

महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, ब—ह्मेश्वर बाग, तटाकडील तालीम, चंद्रेश्वर, संध्यामठ, फुलेवाडी, रंकाळा टॉवर, शिवाजी पेठ काही भाग, गुजरी, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, गंगावेश, दुधाळी, पंचगंगा रोड, लोणार चौक, पापाची तिकटी, बुरुड गल्ली, सोन्या मारुती चौक, शिपुगडे तालीम, पिवळा वाडा, डोर्ले कॉर्नर, सिद्धार्थनगर, ब—ह्मपुरी, उत्तरेश्वर पेठ, लक्षतीर्थ वसाहत, बलराम कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड व रिंगरोडला संलग्नित ग्रामीण भाग, गजानन कॉलनी, जयभवानी कॉलनी, अयोध्या कॉलनी, लक्ष्मी नारायण कॉलनी, चैनानी नगर, अभियंता कॉलनी, बोंद्रेनगर, जिल्हा परिषद कॉलनी, शिवदत्त कॉलनी, वेदगंगा अपार्टमेंट, महिपती पार्क, सृष्टी पार्क, धनगरवाडा, गडकरी कॉलनी, मथुरा नगरी, शिवशक्ती कॉलनी, कोतवाल नगर, इंगवले कॉलनी, न्यू इंगवले नगर, अमेय अपार्टमेंट, नरसिंह कॉलनी, सत्याईनगर, राज्याभिषेक कॉलनी,  अष्टविनायक कॉलनी,

श्रीकृष्ण कॉलनी, माऊली नगर, न्यू डायना कॅसल, दत्त कॉलनी, न्यू कणेरकरनगर, शिवछाया पार्क, संत सेना नगर. राजारामपुरी पहिली ते 13 वी गल्ली, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, राजारामपुरी एक्स्टेन्शन, टाकाळा, पांजरपोळ, सम—ाटनगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन, ग्रीनपार्क, शाहूपुरी पहिली ते चौथी गल्ली, व्यापारपेठ, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडीक वसाहत आदी. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

या ग्राहकांना बसणार फटका

निवासी : 1,03,106
व्यापारी : 1,723
औद्योगिक : 1,486
एकूण : 1,06,315

Back to top button