कोल्हापूर : अंबप, अंबपवाडी येथील गायरान अतिक्रमणधारक देणार कायदेशीर लढा | पुढारी

कोल्हापूर : अंबप, अंबपवाडी येथील गायरान अतिक्रमणधारक देणार कायदेशीर लढा

कासारवाडी; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील अंबप, अंबपवाडी येथील सर्व गायरान अतिक्रमणधारकांना महसूल प्रशासनाने नोटीस बजावली आहे. या विरोधात ग्रामस्थ कायदेशीर लढा देणार आहेत. यासाठी ॲड. राजावर्धन पाटील हे आपल्या सहकार्यासह नागरिकांना मोफत मार्गदर्शन व सल्ला देणार आहेत.

अंबपमधील ६११ तर अंबपवाडी येथील ११६ गायरान अतिक्रमणधारकांना महसूल प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस लागू केलेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्यामध्ये खळबळ उडाली होती. यासाठी ॲड. राजवर्धन पाटील यांनी दोन्ही गावात अतिक्रमण धारकांच्या बैठका घेतल्या.

यामध्ये गायरान अतिक्रमणाचा लढा हा कायदेशीर मार्गाने ग्रामस्थांनी लढण्याचा निर्णय घेतला. यासाठी कायदेशीर तरतुदीप्रमाणे तहसीलदार हातकणंगले यांचेकडे सर्व अतिक्रमणधारकांचे लेखी म्हणणे व आवश्यक कागदपत्रे दि. ३० जून पूर्वी दाखल केली जातील. यासाठी वकिलांची मार्गदर्शन मोफत केले.

यावेळी उपसरपंच संभाजी जाधव, माजी उपसरपंच मधुकर जाधव, शिवसेना शाखाप्रमुख सागर चोपडे, डॉ. बी.के.पाटील, सोमराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अतिक्रमणधारक नागरिक उपस्थित होते.

प्रशासनाने गायरान अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. याला लेखी म्हणणे आवश्यक कागदपत्रासह दिलेल्या वेळेत हातकणंगले तहसीलदारांच्याकडे दाखल केले जातील. यासाठी आपण आपल्या सहकाऱ्यांसह काम करणार आहे.

ॲड. राजवर्धन पाटील, अंबप

हेही वाचा;

Back to top button