‘पुढारी’चे सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण योगदान : ज्योतिरादित्य शिंदे | पुढारी

‘पुढारी’चे सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण योगदान : ज्योतिरादित्य शिंदे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दैनिक ‘पुढारी’चे वर्तमानपत्रांत खूप अग्रणी स्थान आहे. ‘पुढारी’चे सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण योगदान आहे, असे गौरवोद्गार नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी काढले. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. दैनिक ‘पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, सौ. गीतादेवी जाधव यावेळी प्रमुख उपस्थित होते.

नागरी विमान वाहतूकमंत्री शिंदे यांनी रविवारी डॉ. जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी डॉ. जाधव यांच्याशी शिंदे यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रांसह विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली. ‘पुढारी’चा वाढता विस्तार आणि त्याद्वारे एका मराठी माणसाने उभे केलेले साम्राज्य याचा आपल्याला अभिमान वाटतो, अशा शब्दांत शिंदे यांनी डॉ. जाधव आणि ‘पुढारी परिवार’चा गौरव केला.

शिंदे कुटुंबीय आणि पुढारी परिवाराशी असलेला दोन पिढ्यांचा जिव्हाळा, कोल्हापूर जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबतही शिंदे यांनी भरभरून सांगितले. डॉ. जाधव यांच्या निवासस्थानी प्रदर्शनी मांडण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांची त्यांनी माहिती घेतली. यावेळी डॉ. योगेश जाधव उत्कृष्ट नेमबाजपटू होते, हे समजताच त्यांनी आपणही शूटर होतो, असे सांगत त्यांनी डॉ. जाधव आणि डॉ. योगेश जाधव यांच्याशी नेमबाजीवरही दिलखुलास संवाद साधला.

डॉ. जाधव यांच्या हस्ते करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, ओडिशामधील खासदार अपराजिता सारंगी, आमदार प्रकाश आवाडे व भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.

Back to top button