कोल्‍हापूर : कागलच्या अंजली तेलवेकरची भारतीय नौदलात एसएसआर पदी निवड | पुढारी

कोल्‍हापूर : कागलच्या अंजली तेलवेकरची भारतीय नौदलात एसएसआर पदी निवड

सिद्धनेर्ली ; पुढारी वृतसेवा पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील अंजली शंकर तेलवेकर हिची इंडियन नेव्ही मध्ये एसएसआर पदी निवड झाली आहे. सामान्य कुटुंबातील अंजलीने मिळवलेल्या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लहानपणापासून पोलीस अथवा सैन्य दलात काम करण्याची उमेद उराशी बाळगून त्यासाठी ती मेहनत करत होती. कॉलेज करत करत यासाठी प्रशिक्षणही घेत होती. आपल्याला भरती होऊन मोठी कामगिरी करायची आहे अशी इच्छा उराशी बाळगून ती तळसंदे येथील प्रशिक्षण केंद्रात याबाबत प्रशिक्षण घेत होती. त्याच बरोबर ती कागल येथील डी आर माने महाविद्यालयात आपले उच्य शिक्षणही घेत आहे.

शालेय जीवनापासूनच खेळाची आवड असलेल्या अंजलीने आतापर्यंत रिले सारख्या खेळात शालेय, तालुका पातळीवर अनेकवेळा मोठी कामगिरी केली आहे. त्यामध्ये तिने मेडल मिळविली आहेत. सामान्य कुटूंबात जन्म घेलेलेल्या अंजलीने इंडियन नेव्ही सारख्या ठिकाणी जिद्दीने, परिश्रमाच्या बळावर आपली निवड निश्चित करून आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. अंजलीने मिळविलेल्या यशामुळे सध्या तिच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button