एस. टी. कर्मचार्‍याच्या नेहमी पाठीशी राहू : सतेज पाटील | पुढारी

एस. टी. कर्मचार्‍याच्या नेहमी पाठीशी राहू : सतेज पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी नेहमी एस.टी. कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. कोव्हिड काळात कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी भरीव निधी दिला. शिवाय संप कालावधीत एस.टी. कर्मचारी संघटनेने पाच महिने कामावर उपस्थित राहून जनतेची सेवा केली हे कार्य कौतुकास्पद आहे. यापुढेही काँग्रेस पक्ष एस.टी. कामगारांच्या पाठीशी राहिल, अशी ग्वाही आ. सतेज पाटील यांनी दिली.

काँग्रेस कमिटी येथे शुक्रवारी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन चव्हाण तर प्रमुख पाहुणे सरचिटणीस श्रीरंग बरगे उपस्थित होते.

संघटनेचे विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर स्वागत केले. सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, एस.टी. कर्मचार्‍यांना वेतन वेळेवर व्हावे, भविष्यात एस.टी.चे बजेट राज्य शासनाच्या बजेटमध्ये समाविष्ट व्हावे, अशी संघटनेची मागणी असल्याचे सांगितले. अध्यक्ष सचिन चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी संघटनेचे सेवानिवृत पदाधिकारी मारुती पुजारी, नामदेव भोसले, राजेंद्र भोसले, बाळासो साळोखे, मारुती पोवार, दिलीप पाटील तसेच गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त संताराम जाधव व प्रामाणिकपणे प्रवाशांचा दोन लाखांचा ऐवज परत केल्याबद्दल एम. ए. मणेर यांचा आ. पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला.

यावेळी बबनराव थोरात, अय्याज चौगुले, सुनील घोरपडे, अरविंद पाटील, रणजित काटकर, उत्तम पाटील, श्रीनिवास कुंभार यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Back to top button