बुलढाणा : सिंदखेडराजा जवळ भीषण अपघात; एसटी बस- कंटेनरच्या धडकेत ९ ठार, बसची अर्धी बाजू कापली

सिंदखेडराजा भीषण अपघात
सिंदखेडराजा भीषण अपघात

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : मेहकर ते सिंदखेडराजा मार्गावर पळसखेड चक्का गावाजवळ आज (मंगळवार) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एसटी बस व कंटेनर या दोन्ही भरधाव वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. या दुर्घटनेत पाचजण जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी झालेल्या चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा अपघात इतका भंयकर होता की एसटी बसची अर्धी बाजू पूर्णपणे कापली गेली

मेहकर आगाराची एसटी बस (एम.एच.४०-५८०२) ही पुण्याकडून मेहकरकडे येत होती, तर कंटेनर (ओडी ११-एस १६५७ हा मेहकरहून सिंदखेडराजाच्या दिशेने जात (क्र.एम.एच.४०-५८०२ होता. दोन्ही वाहनांच्या चालकासह एकूण नऊ जण या अपघातात ठार झाले. १२ प्रवाशांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर सिंदखेडराजा, जालना व छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news