शिवाजी विद्यापीठात उद्या ‘पायवाट’ शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग; मिथुनचंद्र चौधरी यांचे व्याख्यान

शिवाजी विद्यापीठात उद्या ‘पायवाट’ शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग; मिथुनचंद्र चौधरी यांचे व्याख्यान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने मंगळवार (दि.23) रोजी सकाळी 11.30 वाजता विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या ऑडिओ-व्हिज्युअल प्रोग्रॅम विभागाचे प्रमुख मिथुनचंद्र चौधरी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. याप्रसंगी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित चौधरी यांच्या 'पायवाट' शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग होणार आहे.

डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनातर्फे चालू शैक्षणिक वर्षापासून 'सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी फोटोग्राफी' व 'सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग' हे अभ्यासक्रम सुरू होत आहेत. अभ्यासक्रमाचा शुभारंभ चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, विद्यार्थी, चित्रपट क्षेत्राशी संबंधित संशोधक, अभ्यासकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news