कोल्हापूर : पुलाची शिरोलीतून दोन मुलांचे अपहरण | पुढारी

कोल्हापूर : पुलाची शिरोलीतून दोन मुलांचे अपहरण

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा :  पुलाची शिरोली, ता. हातकणंगले येथून दोन मुलांचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. शिवराज गणेश वाईकर (वय 12) , विराज गणेश वाईकर (9) अशी त्यांची नावे आहेत. ही मुले खेळण्यासाठी घराबाहेर गेली होती. याबाबत शिरोली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शिवराज व विराज गणेश वाईकर हे दोघे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर गेले होते. ती परत घरी आली नसल्याने त्यांचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यांचे अपहरण झाले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. शिवराज सातवीच्या वर्गात तर विराज हा चौथीत असून ते पेठवडगाव येथील आश्रम शाळेत शिकत आहेत. याबाबतची तक्रार दर्शन आप्पासाहेब कोरडे (रा. दत्तनगर शिरोळ, ता. शिरोळ) यांनी दिली आहे.

Back to top button