कोल्हापूर : शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत संस्था गटात सत्ताधारी आघाडीचा सात जागांवर विजय
आजरा; पुढारी वृत्तसेवा : आजरा तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अ वर्ग सेवा संस्था गटातून सत्ताधारी आघाडीच्या सर्व सात जागा विजयी झाल्या आहेत. ब वर्ग इतर संस्था गटातूनही सत्ताधारीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
तालुका संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत १९ जागांसाठी सत्ताधारी रवळनाथ शेतकरी विकास आघाडी व रवळनाथ परिवर्तन शेतकरी विकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत झाली. अ वर्ग सेवा संस्था गटातून सत्ताधारी गटाचे अल्बर्ट डिसोजा, विठ्ठलराव देसाई, सुनिल देसाई, दौलती पाटील, महादेव पाटील, राजाराम पाटील, महादेव हेब्बाळकर तर ब वर्ग इतर संस्था गटातून सत्ताधारी गटाचे उदयराज पोवार विजयी झाले आहेत. व्यक्ती गट व राखीव गटातील मतमोजणी सुरु आहे. दुपारी एक वाजेपर्यंत हे निकाल अपेक्षित आहे. सुरुवातीच्या आठ जागांचे निकाल सत्ताधारीच्या बाजूने लागल्यामुळे सत्ताधारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
हे ही वाचा :
- Karnataka Elections : कर्नाटक निवडणूक; कोल्हापूर परिक्षेत्रात ४ कोटींचा मुद्देमाल जप्त; २८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
- Bidri Sugar Factory Election : बिद्री साखर कारखाना निवडणूकीत रंगली बिद्रीच्या चिमणीची चर्चा!
- कर्नाटक विधानसभा निवडणूक : दहा वर्षांत निवडणूक खर्चात 219 टक्के वाढ