कोल्हापूर : आठ तासांची जटिल शस्त्रक्रिया अन् तुटलेला हात पुन्हा जोडला! | पुढारी

कोल्हापूर : आठ तासांची जटिल शस्त्रक्रिया अन् तुटलेला हात पुन्हा जोडला!

कोल्हापूर : मित्रांच्या भांडणात 27 वर्षांच्या तरुणाचा मनगटापासून तुटलेला केवळ कातडीच्या साह्याने लटकत असलेला हात पुन्हा जोडण्यात यश आले. रात्री अडीच वाजता सुरू झालेली शस्त्रक्रिया दुसर्‍या दिवशी सकाळी 11 पर्यंत चालली.

कराड जवळच्या एका गावात मित्रांबरोबर झालेल्या भांडणात या तरुणावर वार झाला. यात त्याचा हात मनगटापासून तुटला. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास हा रुग्ण अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटरमध्ये आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. मयुरेश देशपांडे यांनी या रुग्णावर रात्री अडीच वाजता शस्त्रक्रिया सुरू केली. अतिशय गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या शस्त्रक्रियेत दोन हाडे, 22 टेंडन्स, 2 रक्त वाहिन्या, 2 नर्व्ह, 4 मसल्स रिपेअर करून जोडण्याचे अतिशय कठीण काम निष्णात मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जन असलेल्या देशपांडे यांनी कौशल्याने पार पाडले. भूलतज्ज्ञ शशिकांत सांगावकर आणि डॉ. तन्वी देशपांडे यांचे सहकार्य लाभले.

 

Back to top button