कोल्हापूर : १०८ रुग्णवाहिकेमुळे ४ लाख लोकांचे प्राण वाचले | पुढारी

कोल्हापूर : १०८ रुग्णवाहिकेमुळे ४ लाख लोकांचे प्राण वाचले

कोल्हापूर; डॅनियल काळे :  महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अपघातानंतर तातडीची रुग्णवाहिका सेवा पुरविल्यामुळे गेल्या तीन वर्षांत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील सुमारे चार लाखांहून अधिक लोकांचे प्राण वाचविले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे अपघातग्रस्त किंवा इतर कारणांनी जखमी झालेल्या रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्याने लोकांच्या द़ृष्टीने 108 रुग्णवाहिकेमुळे नवसंजीवनीच मिळाली आहे. रस्ते रुंद व दर्जेदार झाले, रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळली, तर आणखी हजारो लोकांचे जीव वाचविण्यात मदत होणार आहे.

 

डॉक्टरांची संख्या : 209
रुग्णवाहिका चालक  : 206

आधुुनिक रुग्णवाहिका

108 या नावाने ओळखली जाणारी ही रुग्णवाहिका व्हेंटिलेटरसह अन्य आधुनिक उपकरणांनी सज्ज आहे. त्यामुळे लोकांचे प्राण वाचविणे शक्य होत आहे.

या रुग्णवाहिका ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत सेवा देत आहेत. लोकोपयोगी सेवेमुळे अनेक अपघातग्रस्त लोकांना वेळेत उपचार मिळाले. गरोदर महिलांना वेळेत रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांना उपचार मिळाले आहेत. शहरी भागात 20 मिनिटांत, तर ग्रामीण भागात 30 मिनिटांत ही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते.
– डॉ. संग्राम मोरे,
विभागीय व्यवस्थापक

Back to top button