दै. पुढारी ‘एज्यु दिशा’चे आयोजन | पुढारी

दै. पुढारी ‘एज्यु दिशा’चे आयोजन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिक्षण आणि करिअरसंदर्भात भविष्याचा अचूक वेध घेणारे भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन दै ‘पुढारी’च्या वतीने करण्यात आले आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील प्रदर्शनात करिअरची अगणिक संधी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये विद्यार्थी व पालकांना नामवंत शिक्षण संस्थांमार्फत मार्गदर्शन केले जाणार असून उत्तुंग यशाची ध्येय बाळगणार्‍या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या ध्येयप्राप्तीच्या स्वप्नांना बळ लाभणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता निकालाचे वेध लागले आहेत. जीवनाची दिशा ठरवणार्‍या या प्रवेशाचा निर्णय घेताना विद्यार्थी पालकांत गोंधळाची स्थिती दरवर्षी कायम असते. अशा विद्यार्थी व पालकांसाठी दै. पुढारी ‘एज्यू दिशा’ मागील अनेक वर्षांपासून वाटाड्याच्या भूमिका चोख बजावत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही हे प्रदर्शन लवकरच भरवण्यात येणार आहे. यामध्ये करिअरविषयक अचूक मार्गदर्शन तज्ज्ञांकडून केले जाणार आहे.

प्रदर्शनात अनेक शैक्षणिक उपक्रमांसंदर्भात स्टॉलही भरवले जाणार असून उदंड प्रतिसादासाठी भव्य शैक्षणिक प्रदर्शनात आपला स्टॉल बुकिंगसाठी रोहित 9834433274, प्रणव 9404077990 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे .

Back to top button