

दानोळी; पुढारी वृत्तसेवा : दानोळी येथील आदर्श गाव धरणग्रस्त वसाहत मधील इमाम बाबजी पटेल यांच्या घरी रविवारी (दि.८) रात्री घरफोडी झाली. या घरफोडीत अंदाजे 12 तोळे सोने, 42 भार चांदीचे ऐवज व 45000 रुपये रोख रक्कम चोरीस गेली आहे.
या घटनेची माहिती पोलिस पाटील प्रशांत नेजकर यांना देण्यात आली. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले असता बीट अंमलदार जी. ए. सनदी, पो.कॉ. बाळासाहेब चव्हाण यांनी पाहणी करून पंचनामा केला. यानंतर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पण श्वान घरा भोवती घुटमळत राहिले. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा :