कोल्हापूर : दोनवडे येथे एस.टी.च्या धडकेत पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी | पुढारी

कोल्हापूर : दोनवडे येथे एस.टी.च्या धडकेत पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

दोनवडे; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर दोनवडे फाट्याजवळ एस.टी.च्या धडकेत दुचाकीवरील अरुंधती बाळासाहेब पाटील (वय 48) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती बाळासाहेब आकाराम पाटील (रा. कुडित्रे, ता. करवीर) गंभीर जखमी आहेत. बुधवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान हा अपघात घडला.

देवगड-तुळजापूर एस.टी. बस कोल्हापूरकडे निघाली होती; तर बाळासाहेब पाटील हे पत्नी अरुंधतीसह दुचाकीवरून कुडित्रे येथे गावी निघाले होते. दोनवडे फाट्याजवळ वळणावरील तीव— उतारावर एस.टी.चालकाचा बसवरील ताबा सुटला व विरुद्ध दिशेला जात मोटारसायकलने येणार्‍या पती-पत्नीच्या थेट अंगावर बस गेली. बाळासाहेब यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एस.टी.चा कमानपाटा तुटल्याने एस.टी. एका बाजूला ओढली गेली व ताबा सुटल्याने विरुद्ध दिशेला जाऊन अपघात झाला, असे एस.टी.चालकाचे म्हणणे आहे.

 

Back to top button