कोल्हापूर : किणेजवळ कार झाडाला धडकून जवानाचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : किणेजवळ कार झाडाला धडकून जवानाचा मृत्यू

आजरा; पुढारी वृत्तसेवा :  किणे (ता. आजरा) नजीक बुधवारी दुपारी कार झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात सुट्टीवर आलेले जवान मसणू धोंडिबा मनगुतकर (वय 32, रा. तावरेवाडी ता. गडहिंग्लज) यांचा मृत्यू झाला.

मनगुतकर हे आपल्या मामाच्या मुलीच्या लग्नासाठी बुधवारी (दि. 3) गावी आले होते. कामानिमित्त ते आजर्‍याकडे आपल्या कारने (एम.एच. 06 एएस 8556) येत असता त्यांचा कारवरील ताबा सुटून कार झाडावर आदळली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मनगुतकर हे 2014 साली सातारा येथे सैन्यात भरती झाले होते. त्यांनी शीख रेजिमेंटमधून लेह-लडाख, लखनौ या ठिकाणी 5 वर्षे सेवा बजावली. त्यांच्या मागे आई, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. अत्यंत कष्ट करून त्यांनी सैन्यात प्रवेश मिळविला होता.  त्यांच्या अपघाती निधनाने तावरेवाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button