‘अमित शहांसोबत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या तीन बैठका’

‘अमित शहांसोबत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या तीन बैठका’
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आतापर्यंत तीन बैठका झाल्याचे आपल्याला समजले असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी चव्हाण आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. हा निकाल मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात गेला, तर नवीन मुख्यमंत्री नेमावा लागेल. तो कोठून घ्यायचा? बाहेरून घ्यायचा की राष्ट्रवादीतून घ्यायचा याबाबत होत असलेल्या चर्चा सर्वांनाच माहीत आहेत, असा दावाही चव्हाण यांनी केला.

दरम्यान, काल बेळगाव येथे बोलताना कर्नाटक निवडणुकीत भाजपला फायदा होईल, अशी कृती राष्ट्रवादीने करू नये, असे आवाहन चव्हाण यांनी केले होते. राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द झाल्याने त्यांनी इतर राज्यात निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी यासंदर्भात काँग्रेसबरोबर चर्चा व्हायला हवी होती. आताही आम्ही चर्चेसाठी तयार असून, यातून मार्ग काढला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news