राशिवडे; पुढारी वृतसेवा : राधानगरीसह भुदरगड तालुक्यामध्ये गर्भलिंग निदान करणाऱ्या रँकेटमधील फरारी असलेल्या चारपैकी दोन आरोपींना राधानगरी पोलिसांनी अटक केली. राजेंद्र हिंदुराव यादव (वय ४२, रा. गाडेगोंडवाडी, ता. करवीर) आणि डॉ. प्रसाद शांताराम ढेंगे (वय ४२, रा. मडिलगे, ता. भुदरगड) अशी त्यांची नावे असून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींची संख्या सतरावर पोहोचली असून यामधील आणखी दोघेजण फरार आहेत.
राधानगरी पोलिसांनी जिल्ह्यामध्ये गर्भलिंग चाचणी करणारे मोठे रँकेट उघडकीस आणुन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. गेल्या चार महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत १७ जणांना अटक झाली आहे. यामधील गजेंद्र बापू कुसाळे, रा. शिरसे, ता.राधानगरी व ओंकार कराळे, रा. सडोली खालसा, ता. करवीर दोघेजण फरारी आहेत. डॉ. ढेंगे व यादव यांनी अटकपुर्व जामीनसाठी प्रयत्न केले. परंतु त्यांचे अटकपुर्व अर्ज फेटाळल्याने ते राधानगरी पोलीस ठाण्यात हजर झाले. राधानगरी प्रथमवर्ग न्यायालयासमोर या दोघांना हजर केले असता यादव याला एकदिवसाची तर डॉ. ढेंगेला दोन मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पो. नि. स्वाती गायकवाड, पो.हे.कॉ.के.डी. लोकरे, सुरेश मेटील करत आहेत.