कोल्हापूर बाजार समितीसाठी उद्या मतदान | पुढारी

कोल्हापूर बाजार समितीसाठी उद्या मतदान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता रमण मळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये मतदान साहित्य देण्यात येणार आहे. तेथून हे कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना होणार आहेत.

समितीच्या कार्यक्षेत्रातील साडेसहा तालुक्यांतील 70 मतदान केंद्रांवर शुक्रवारी (दि.28) सकाळी 8 ते सायं.5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यासाठी एकूण 480 अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . विकास संस्था गटात एकूण 36 केंद्रे, ग्रामपंचायत गटामध्ये एकूण 29 केंद्रे, व्यापार व्यापारी गटात 3 केंद्र आणि हमाल तोलाई गटात 2 केंद्रे आहेत. मतमोजणी रविवार (दि.30) रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये होणार आहे.

Back to top button