कोल्हापूर : आयआयटी-जेईई व नीट परीक्षांसाठी मार्गदर्शन

कोल्हापूर : आयआयटी-जेईई व नीट परीक्षांसाठी मार्गदर्शन

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दहावी आणि बारावीनंतर मुलांच्या आणि त्यांच्या पालकांपुढे उभा राहतो, तो करिअरचा विषय! आपल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे, असेच बहुतांश पालकांचे स्वप्न असते. यापैकी नेमक्या कोणत्या विषयात मुलाला गती आहे, पुढे कोणकोणत्या संधी आहेत, त्या कशा मिळवायच्या, कोणाला भेटायचे, असे असंख्य प्रश्न त्यांच्यासमोर असतात.

8 वी, 9 वी, 10 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांना वेळीच मार्गदर्शन मिळाले, तर त्यांची पुढील वाटचाल सुकर होते. विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील या प्रश्नाची उत्तर देणार्‍या खास शिबिराचे आयोजन दैनिक 'पुढारी', 'इन्स्पायर अ‍ॅकॅडमी' आणि 'पेस आयआयटी अ‍ॅण्ड मेडिकल' यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

कोल्हापूरची 'इन्स्पायर अ‍ॅकॅडमी' आणि पुण्याची 'प्रोफेशनल अ‍ॅकॅडमी फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन' (पेस आयआयटी अ‍ॅन्ड मेडिकल) या दोन्ही संस्था प्रवेश परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकाल देणार्‍या आहेत. त्यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना व पालकांना 'विज्ञान शाखेतील शिक्षण आणि करिअरच्या संधी' याबाबत या संस्था मार्गदर्शन करणार आहेत. अभियांत्रिकीसाठी 'जेईई' आणि वैद्यकीयसाठी 'नीट' या परीक्षांविषयीची सविस्तर माहिती यावेळी दिली जाणार आहे. या दोन्ही संस्थांच्या ज्या विद्यार्थ्यांची निवड आयआयटी, तसेच सरकारी व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये झाली आहे, त्यांचे पालकही आपले अनुभव या शिबिरात मांडणार आहेत.

या मार्गदर्शनपर शिबिरात विद्यार्थी, पालकांना विनामूल्य प्रवेश आहे, पण त्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी पूर्वनोंदणी करून शिबिराचा लाभ घ्यावा आणि करिअरविषयीचा संभ्रम दूर करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

विषय : दहावीनंतरचे करिअर-निवड व मार्गदर्शन
दिवस : शनिवार (दि. 29)
वेळ : सकाळी 10 वाजता
स्थळ : शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर
प्रवेश : विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क
रोहित : 9834433274
प्रणव : 9404077990

नाव नोंदणीसाठी वरील क्यूआर कोड स्कॅन करा किंवा खालील लिंकवर जाऊन नाव नोंदणी करा.
https://t.ly/wuew

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news