बंटी पाटील, गरळ ओकाल, तर गाठ माझ्याशी आहे : शौमिका महाडिक

बंटी पाटील, गरळ ओकाल, तर गाठ माझ्याशी आहे : शौमिका महाडिक
Published on
Updated on

कोल्हापूर : बंटी पाटील आजवर आम्ही संयम बाळगला; पण आता नाही. तुम्ही ज्या भाषेत टीका कराल त्याच भाषेत तुम्हाला प्रत्युत्तर देऊ. गरळ ओकाल तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी दिला.

राजाराम कारखाना निवडणूक प्रचारसभेत त्या बोलत होत्या. महाडिक म्हणाल्या, प्रत्येक निवडणुकीत तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन टीका करता. आम्ही ती सहन करतो; पण इथून पुढे महादेवराव महाडिक यांच्यावर केलेली कोणतीही टीका खपवून घेतली जाणार नाही. तुम्ही आणि तुमचे पाळलेले पेटार्‍यातले साप यांनी गरळ ओकणे बंद केले नाही, तर आम्ही तुमचा फणा ठेचल्याशिवाय राहणार नाही. जो तुम्हाला दूध पाजतो, तुम्ही त्यालाच डसता हा तुमचा इतिहास आहे. देवस्थानच्या जमिनी हडपण्यासाठी तुम्ही चक्क देव मारला. तुम्ही शेतकर्‍यांना काय सोडणार, अशी जहरी टीका महाडिक यांनी केली. तुमच्या सगळ्या करामती मी बाहेर काढणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

ज्येष्ठ सभासदांनी शौमिका महाडिक यांची भेट घेऊन आमचे आशीर्वाद तुम्हालाच आहेत, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी वसंत मगदूम, तानाजी पाटील, वैष्णवी नाईक, मीनाक्षी पाटील, अशोक पवार, सुनील कदम, सत्यजित कदम, राजवर्धन नाईक निंबाळकर, दिनकर माळी, छाया भावड, स्वरूप पाटील, महादेव खानविलकर, शिवाजी निकम, भिकाजी गाडगीळ यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news