कोल्हापूर : पावनखिंड येथील स्मृतिस्तंभासह पायऱ्यांचे निखळताहेत दगड

कोल्हापूर : पावनखिंड येथील स्मृतिस्तंभासह पायऱ्यांचे निखळताहेत दगड

विशाळगड : सुभाष पाटील : बाजीप्रभू व फुलाजी प्रभू देशपांडे आणि तीनशे मावळ्यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या ऐतिहासिक पावनखिंडीत उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभासह दगडी पायऱ्यांचे दगड तसेच कठडे निखळत असल्याने खिंडीचा ऐतिहासिक बाज धोक्यात आला आहे. या पायऱ्यांची डागडुजी करण्याची मागणी पर्यटक, इतिहास प्रेमींतून होत आहे.

पावनखिंड येथे शिवकाळात झालेल्या स्फूर्तीदायी इतिहासाचे जतन- संवर्धन आणि संरक्षण व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाच्यावतीने या परिसरात दोन कोटी निधींतून स्मारकाची उभारणी, भक्कम तटबंदी, २० फूट उंचीचा टेहळणी बुरुज, दगडी पायर्‍या असे एखाद्या किल्ल्यासारखे स्मारक बांधण्यात आले. यामुळे या परिसरातील नैसर्गिक सौदर्यांत ऐतिहासिक वैभवाची भरच पडली. 'स्फूर्तिदायी इतिहासाला साजेसे स्मारकामुळे इतिहास व निसर्ग प्रेमींबरोबरच पर्यटकांच्या आकर्षणाचे हे केंद्र म्हणून नावारुपाला आले आहे.

संपूर्ण काम दगडी करण्यात आले आहे. येथे पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कुटुंबासह येत असतात. खिंडीच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या बांधकामाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून खिंडीकडे जाणारा रस्ताही उखडला आहे. तसेच २० फूट उंचीच्या टेहळणी बुरुजावरील झेंड्याच्या बांधकामाची पडझड, दगडाचे सिमेंट निघून गेल्याने मोठ्या भेगा पडल्या आहेत. तसेच खिंडीकडे जाणाऱ्या सुमारे २१० दगडी पायरी मार्गावरील बहुतांश पायऱ्यांचे दगड निखळले आहेत. निखळलेल्या दगडांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news