कोल्हापूरचा पारा 39 अंशांवर; उकाडा वाढला | पुढारी

कोल्हापूरचा पारा 39 अंशांवर; उकाडा वाढला

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्याचा पारा 40 अंशांकडे चालला आहे. मंगळवारी कोल्हापुरात 39.1 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. किमान तापमानातही सरासरीपेक्षा तीन अंशांनी वाढ झाली. दिवसभरात 25 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. यामुळे हवेत आज दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत होता.

गेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत चालली आहे. आजही सकाळपासून हवेत उष्मा होता. दुपारी उन्हाची तीव—ता अधिक होती. अंगातून घामाच्या धारा वाहणार्‍या आणि अंगाची लाही लाही करणार्‍या उन्हाने नागरिक हैराण झाले होते. सायंकाळनंतरही हवेत उकाडा होता. यामुळे बहुतांशी नागरिकांनी दिवस-रात्र पंखे, वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवली.

आज पाऊस होईल अशी शक्यता होती. मात्र, हवेत उकाडा वाढूनही पाऊस झाला नाही. उद्यापासून दोन दिवस दुपारनंतर पाऊस होईल, असा अंदाज आहे. यानंतर पारा पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Back to top button