संधिवात : बदलती जीवनशैलीच संधिवाताला कारणीभूत

संधिवात : बदलती जीवनशैलीच संधिवाताला कारणीभूत

संधिवात एक आजार नाही तर लक्षण आहे. अनेक कारणांमुळे संधिवात निर्माण होतो. संधिवाताला सांधेदुखी असेही म्हणतात. सांध्यामध्ये कार्टिलेज नावाचा घटक असतो. या कार्टिलेजमुळे सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होत असते. कोणत्याही कारणास्तव कार्टिलेजची झीज झाली की सांधेदुखी वाढते, वेदना असह्य होतात. सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासली जातात. त्यामुळे गुडघ्यामध्ये सूज येते. या स्थितीला सांधेदुखी किंवा ऑस्टिओर्थराटिस असे म्हणतात. या सर्वाला बदलती जीवशैलीच कारणीभूत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

वयाच्या दुसर्‍या वर्षापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणालाही संधिवाताचा त्रास होऊ शकतो. 0.5 ते 1 टक्के लोकसंख्येमध्ये संधिवात त्यांच्याशी निगडीत आजार होऊ शकतात. प्रदूषण, चिकनगुनिया साथीमुळे हे प्रमाण वाढत आहे.वाढत्या वयानुसार कार्टिजेलची क्षमता कमी होते, झीज वाढते जाते. त्यामुळे संधिवाताचे प्रमाण वृद्ध व्यक्‍तीमध्ये अधिक आहे.

संधिवाताची लक्षणे : सांधे दुखणे, सूज येणे, हाता-पायाची बोटे वाकडी होणे, केस गळती, ताप, चेहरा लाल होणे, शरीराव चट्टेे, थंडीत हाता-पायावर पांढरे चट्टे, हात व पाय थंड होणे, स्तायू कमजोर पडणे, डोळे लाल होऊन दिसण्याचा त्रास होणे, सांध्यांची हालचाल योग्यरितीने न होणे, तसेच चालताना, वाकताना, बसताना त्रास होणे, जिना चढताना-उतरताना वेदना होता.

संधिवाताचे प्रकार व धोके ः प्रामुख्याने संधिवाताचे प्रकार दोन आहे.

पहिला म्हणजे झिजेचा संधीवात ः यामध्ये वयोमानानुसार स्थायू कमजोर होणे, कुर्चाची झीज होते. दुसरा प्रकार म्हणजे,

सुजेचा संधीवात ः हा गंभीर प्रकार असून सांध्यांना सूज येते. सांधे, हाता-पायाची बोटे, गुडघे, मनगट, कोपरांचे सांधे आखडतात. आमवात पाठीच्या मनक्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे रुग्ण वाकत जाऊन मानेला त्रास होतो. सुजेच्या संधिवातामध्ये इतर अवयवांना (हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड) सूज येते. कालांतराने अवयव निकामी होण्याची शक्यता असते. स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर आमवात पुरुषांमध्ये पाठीच्या मनक्याचा संखिवात आहे आणि गाऊट पुरुषांमध्ये जास्त असतो.

उपचारपद्धती ः आजाराचे वेळेत निदान होणे महत्त्वाचे आहे. संधिवात कसा झाला हे लक्षात येणे महत्त्वाचे असते. आमवात, सोरियासिस, पाठीच्या मनक्याचा संधिवात, गाऊट यावर वेळीच औषधोपचार केल्यास संधिवातमुक्‍त आरोग्यदायी जीवन जगता येते.

काय करावे ः : वैद्यकीय सल्ल्याने औषधे घ्यावीत, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे सुरू व बंद करावीत, नियमित व्यायाम महत्त्वाचा, सकस व संतुलित आहार (बंधन नाही) घ्यावा. वजन नियंत्रणात ठेवावे.

काय टाळावे ः मांडी घालून बसू नये, बंद बरणीचे झाकण, नळ सुरू करताना जोर लावून उघडू नये. वजन नियंत्रणात ठेवावे, जोराने कपडे पिळू नये.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news