कोल्हापूर : ‘नदीजोड’ जनजागृतीसाठी देशव्यापी सायकल मोहीम... | पुढारी

कोल्हापूर : ‘नदीजोड’ जनजागृतीसाठी देशव्यापी सायकल मोहीम...

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  नदीजोड प्रकल्पा संदर्भातील जनजागृतीसाठी कोईमतूर (तामिळनाडू) येथील 22 वर्षीय बायोमेडिकल इंजिनिअर मुथू सेल्व्हन या युवकाने देशव्यापी सायकल मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत तीन वर्षांत एकूण 34 हजार कि.मी. प्रवास करण्याचे मुथू याचे ध्येय आहे. महत्त्वाचे म्हणजे मुथूची सायकल विनागियर आहे.

गेल्या दिड वर्षात त्याने 14 राज्यातील 400 जिल्ह्यांचा 8 हजार 600 कि.मी. प्रवास पूर्ण केला आहे. नुकताच तो कोल्हापुरात दाखल झाला. त्याचे स्वागत लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर येथे पियुष प्रकाश दोशी यांनी केले. त्यानंतर मुथूने शुक्रवारी दै. ‘पुढारी’ भवनला भेट देऊन पुढारीकार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. मुथूचे वडील बांधकाम कामगार तर आई गृहिणी असून त्याला बहीण, भाऊ आहे. दीड वर्षापूर्वी 2 डिसेंबरला मुथूने आपल्या सायकल मोहिमेची सुरुवात केली. तामिळनाडू, आंध— प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात राज्याचा प्रवास त्याने पूर्ण केला. चार दिवसांपूर्वी तो महाराष्ट्रात आला. आतापर्यंत त्याने 14 राज्यातील 400 जिल्ह्यांतून प्रवास केला आहे. दररोज 50 ते 60 कि.मी. प्रवास तो करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीने मोहिमेची सांगता होणार असल्याचे त्याने सांगितले.

Back to top button