कोल्हापूर : ‘चैत्रांगण’ आनंदाचे क्षण; वन ओटीटी अ‍ॅपचे स्वप्निल जोशी यांच्याशी थेट संवाद | पुढारी

कोल्हापूर : ‘चैत्रांगण’ आनंदाचे क्षण; वन ओटीटी अ‍ॅपचे स्वप्निल जोशी यांच्याशी थेट संवाद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  पुढारी कस्तुरी क्लब आणि वन ओटीटीच्या संयुक्त विद्यमाने ‘चैत्रांगण’ आनंदाचे क्षण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्वप्निल जोशी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी कस्तुरी सभासदांना मिळणार आहे, तसेच आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांचा रेसिपी शो आयोजित करण्यात आला आहे. व्हीटी पाटील स्मृतिभवन, राजारामपुरी येथे रविवारी (दि. 16) रोजी दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात स्वप्निल जोशी हे आपल्या आगामी ‘वन ओटीटी (1 जढढ) -भारताचा मोबाईल टीव्ही’ या बहुभाषिक मोफत मनोरंजन प्लॅटफॉर्मविषयी कस्तुरी सभासदांशी थेट संवाद साधणार आहेत. सुरुवातीला मराठी, गुजराती, बंगाली आणि हिंदी या भाषांमधल्या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षकांना या अ‍ॅपवर घेता येईल. यावेळी कस्तुरी सभासदांना स्वप्निल जोशी यांच्याशी थेट गपशप करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमात शेफ विष्णू मनोहर आंब्यापासून तयार होणार्‍या विविध रेसिपींचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. तसेच कुकिंगच्या भरपूर टिप्स सभासदांना देणार आहेत. शेफ विष्णू मनोहर यांनी 16 विश्वविक्रम केले आहेत. नुकतेच त्यांनी पुण्यात तीस हजार लोकांसाठी एकावेळी सात हजार किलो मिसळ बनवली होती. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शेफकडून मार्गदर्शनाची संधी कस्तुरी सभासदांना मिळणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान कस्तुरी सभासदांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कच्च्या आंब्यापासून तिखट-गोड पदार्थ, पन्ना मसाला वापरून पुलाव या रेसिपींचा स्पर्धेत समावेश आहे. पाककला स्पर्धा विजेत्यांना गोल्ड प्लेटेड ज्वेलरी व मसाला यांचे गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. नाव नोंदणीसाठी 15 एप्रिलपर्यंत टोमॅटो एफएम कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सभासदांसाठी सेल्फी स्टुडिओज उद्यमनगर यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी सेल्फी पॉईंट उभा केला आहे. यांच्याकडून फॅशन, प्री. वेडिंग, किडस् फोटोग्राफीसाठी पर्याय मिळतात. या कार्यक्रमाचे प्रायोजक रॅगसन्स आर्ट ज्वेलरी, जीआण ट्रेडर्स यांचा पन्ना मसाला, स्टुडीओ लक्स-बॉश, हॉटेल केट्री हे आहेत.

रॅगसन्स ज्वेलर्स हे 23 फेब—ुवारी 2023 पासून व्हीनस कॉर्नर कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. या शोरूममध्ये 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी, आर्ट, सिल्व्हर, कुंदन, कॉपर, ऑक्सिडाईज, रजवाडी, अँटीक आणि महाराष्ट्रीयन ज्वेलरी योग्य दरात उपलब्ध आहेत. खरेदींवर वेगवेगळे डिस्काऊंट आहेत. गोल्ड प्लेटेड मूर्ती आणि गिफ्ट आर्टिकलदेखील उपलब्ध आहेत.

जीआण ट्रेडर्स लक्ष्मीपुरी हे पन्ना मसाल्याचे जिल्ह्याचे वितरक आहेत. चार महिन्यांपासून हा मसाला बाजारात आला असून, यामध्ये सर्व प्रकारचे हळद, चटणी, बिर्याणी, धना पावभाजी मसाले उपलब्ध आहेत. स्टुडिओ लक्स हे परिख पूल येथील इलेक्ट्रिक वस्तूंचे शोरूम असून, बॉश कंपनीच्या फ्रीज, वॉशिंग मशिन, मिक्सर, टीव्ही, मायक्रोवेव्ह अशा वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत. सध्या जुनी वस्तू देऊन नवीन वस्तू खरेदी करण्याची ऑफर सुरू आहे. शिवाजी पार्क येथील हॉटेल केट्री गेली 26 वर्षे ग्राहकांना सेवा देत आहे. हॉटेलमध्ये मल्टिक्युझिन रेस्टॉरंट, पार्टी हॉल अशा सुविधा आहेत. मराठी हिंदी सिनेकलाकारांची या हॉटेलला पसंती असते. अधिक माहितीसाठी : 8805024242, 8329572628.

‘कस्तुरी’ मेंबरसाठी आकर्षक लकी ड्रॉ

  • प्रत्येक सभासदांनी हिरवी साडी, हिरव्या बांगड्या व गजरा परिधान करून यावे
  • विजेत्यांना गोल्ड प्लेटेट कोल्हापुरी साज व मसाल्याचे गिफ्ट हॅम्पर
  • प्रत्येक उपस्थित सभासदाला पाच मसाल्यांचे पॅकेटस् आणि मँगो ड्रिंक
  • उपस्थित राहण्यासाठी कस्तुरी क्लबचे ओळखपत्र आवश्यक आहे

Back to top button