कोल्हापूर जिल्ह्यात आणखी १६१४ कोरोनाग्रस्त | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी १६१४ कोरोनाग्रस्त

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हावासीयांसाठी शनिवार दिलासादायक ठरला. बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या वाढली.

गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 1,614 बाधित रुग्ण सापडले, तर 2,038 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज केले. कोरोनाबाधित 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 387 जणांना कोरोना संसर्ग झाला असून, मृतांत 7 जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाने आरोग्य प्रशासनाची चिंता वाढवली आहे. शनिवारी बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होऊन डिस्चार्ज घेतलेल्यांची संख्या वाढल्याने समाधानाचे वातावरण आहे. मृतांत शहरातील कदमवाडी, राजेंद्रनगर, लक्षतीर्थ वसाहत, शिवाजी पेठ, ताराबाई पार्क, कपिलतीर्थ मार्केट, मेनन बंगलो परिसरातीलप्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. उर्वरित मृत्यूत करवीर 4, कागल 5, पन्हाळा 2, हातकणंगले 6, तर गडहिंग्लज तालुक्यातील 1 जणाचा समावेश आहे.

प्राप्त अहवालांत आजरा 18, भुदरगड 17, चंदगड 27, गडहिंग्लज 70, गगनबावडा 2, हातकणंगले 222, कागल 92, करवीर 359, पन्हाळा 97, राधानगरी 73, शाहूवाडी 69, शिरोळ तालुक्यातील 63 जणांचा बाधितांमध्ये समावेश आहे. नगरपालिका कार्यक्षेत्रातील 100, तर जिल्ह्याबाहेरील 18 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. शासकीय प्रयोगशाळेत 7 हजार 592 जणांची आरटी-पीसीआर झाली.

यात 417 पॉझिटिव्ह, तर अँटिजेनवर तपासलेल्या 4 हजार 964 स्वॅब चाचणीत 495 नागरिक बाधित आढळले. खासगी प्रयोगशाळेत 8 हजार 935 जणांची तपासणी झाली. यामध्ये 702 जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दिवसभरात 2 हजार 173 जणांची कोरोनाची प्राथमिक तपासणी झाली.

Back to top button