कोल्हापूर : ट्रॅक्टरखाली सापडून एक ठार | पुढारी

कोल्हापूर : ट्रॅक्टरखाली सापडून एक ठार

वाघवे; पुढारी वृत्तसेवा :  पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावानजीक उलटलेल्या ट्रॅक्टरखाली सापडल्याने विठ्ठल धोंडिराम गुरव (वय 40, रा. परळी, ता. शाहूवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.

गुरव यांचे परळी येथे गुर्‍हाळघर आहे. गाळपासाठी ऊस आणण्यासाठी ते पहाटे गावातून कागलकडे निघाले होते. त्यांच्यासोबत संजय ज्ञानू पाटील होते. ट्रॅक्टर पहाटे 4.45 वाजता उत्रे गावाजवळ येताच, त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला व तो उलटला. गुरव हे ट्रॅक्टरखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. संजय पाटील हे जखमी झाले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Back to top button