कोल्‍हापूर : 'त्‍या' विहिरीत पोत्‍यात सापडलेल्‍या दुचाकींच्या पार्टमुळे खळबळ | पुढारी

कोल्‍हापूर : 'त्‍या' विहिरीत पोत्‍यात सापडलेल्‍या दुचाकींच्या पार्टमुळे खळबळ

दानोळी ; पुढारी वृत्तसेवा येथील कवठेसार रोडलगत असलेल्या विहिरीत पोत्यात दुचाकीचे पार्ट सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात उलट-सुलट चर्चांना उत् आला आहे. घटनेची माहिती पोलिस पाटील नेजकर यांना देण्यात आली आहे.

येथील कवठेसार रोडलगत परिट विहीर नावाने ओळखली जाणारी जुनी विहिर आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजता विहीर मालक राहुल वाळकुंजे हे विहिरीच्या पाण्यावर तरंगणारा कचरा काढत होते. तेव्हा त्यांना पाण्यावर एक भरलेले पोते दिसून आले. त्यांनी ते बाहेर काढले तर त्या पोत्‍यात दुचाकीच्या पेट्रोलच्या चार टाक्या व इतर साहित्य आढळले. यात स्‍प्लेंडर, याम्हा, अशा गाड्यांचे पार्ट सापडल्याने घटनेची माहिती पोलिस पाटील प्रशांत नेजकर यांना देण्यात आली.

पोलिस पाटील नेजकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठांच्या आदेशाने सर्व साहित्य जयसिंगपूर पोलिस ठाण्यात जमा केले. पण घटना घडल्यापासून काल (शुक्रवार) सायंकाळपर्यंत एकही पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी यांनी घनस्थळला भेट देण्याची तसदी घेतली नाही.

या घटनेनंतर परिसरात चर्चांना उत आला आहे. हे पार्ट कोणी टाकले या विषयी मतमतांतरे व्यक्‍त केली जात आहे. आणखी पार्ट या किंवा इतर विहरित सापडण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यातच पोलिसांनी या घटनेकडे कानाडोळा केल्याने उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

हेही वाचा :  

Back to top button