कोल्हापूर : क्रेनची दुचाकीला धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर

कोल्हापूर : क्रेनची दुचाकीला धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर

Published on

कोडोली; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर दाणेवाडी गावच्या हद्दीतील नागमोडी वळणावर क्रेनने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील सुमती पांडुरंग पाटील (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती पांडुरंग सदाशिव पाटील (57, मूळ गाव बोरपाडळे, ता. पन्हाळा, सध्या रा. नाळे कॉलनी, कोल्हापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत.

बोरपाडळे येथे चुलतभावाचे उत्तरकार्य आटोपून कोल्हापूरकडे येताना सायंकाळी साडेचार वाजता हा अपघात झाला.
पंडित पाटील यांच्या उत्तरकार्यासाठी पांडुरंग पाटील व त्यांची पत्नी सुमन दुचाकीवरून गेले होते. तेथून परतताना त्यांच्या दुचाकीला क्रेनने पाठीमागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, सुमती पाटील रस्त्यावरून दहा फूट फरफटत गेल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्या जागीच ठार झाल्या. पांडुरंग यांच्या डोक्याला व उजव्या पायाला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पांडुरंग पाटील हे कोल्हापूर एस.टी. आगारात सेवेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news